सहा वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

पुणे – सहा वर्षांपासून फरार असलेल्या सराईतला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. संदीप उर्फ संज्या भगवान शिंदे (रा.जनता वसाहत ) असे त्याचे नाव आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या आदेशाने गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक जायभाय, पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 395,402 नुसार दाखल गुन्हात सहा वर्षांपासून भरार असलेली व्यक्ती जनता वसाहत या ठिकाणी येणार आहे.

त्यानुसार सापळा रचून कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी करता दाखल गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. एक व्यक्ती वाई येथे जात असताना त्यांच्याजवळ असलेले लाल रंगाची व्हिआयपी लाल हॅन्ड बॅगमध्ये ठेवलेले रोख रक्कम रुपये 22 हजार रुपये आणि कागदपत्रे चॉपर दाखवून बळजबरीने त्याने लांबविले होते. हा आरोपी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद , पोलीस उपनिरीक्षक जायभाय, पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे, मनोज भोकरे, विजय कुंभार ,सचिन दळवी, अमित शिंद आणि शंकर गायकवाड यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.