अजित पवार गटाने जबाबदारी सोपविली
तळेगाव ढमढेरे – कात्रज दूध संघांचे विद्यमान संचालक ॲड. स्वप्नील ढमढेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पुणे जिल्हा क्रीडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण पक्षाची बैठक झाली. पक्षाची महत्वाच्या विषयांवर बैठक आयोजित केली होती. यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पक्ष संघटनेत आवश्यकतेनुसार फेरबदल, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अजित क्रीडा महोत्सव २०२४ चे पूर्व नियोजन, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बूथ रचना आढावा याकरिता ही बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,
जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, पिडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, तालुकाध्यक्ष रवी काळे, जिल्हा महिलाध्यक्षा मोनिका हरगुडे, युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, विद्यार्थीविंग अध्यक्ष करण कोकणे, पुणे जिल्हा दूध संघांचे संचालक गोपाळ म्हस्के, निखिल तांबे, कालिदास गोपालघरे, उपाध्यक्ष निवास घाडगे, उप जिल्हाध्यक्ष राजेंद्र घावणे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तृप्ती सरोदे, तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, शिरूर युवकचे अध्यक्ष अमोल वरपे, अमित गव्हाणे, श्रुतिका झाबंरे उपस्थित होते.
जिल्हातील खेळाडूंना व्यासपीठ उभे करून देण्यासाठी तसेच जिल्हातील खेळाडूंना देशपातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी पाठबळ उभे करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे ढमढेरे यांनी निवडीनंतर सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखलपात्र
क्रीडा क्षेत्रातील ढमढेरे यांची कामगिरी पाहता त्यांना राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला असून देश पातळीवरील कामगिरी व आंतराष्टीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुमतीने त्यांची जिल्हा क्रीडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.