पुणे – पेट्रोलवरील दुचाकींसह पर्यावरणपूरक असल्याचा दावा केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या संख्येतही वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सात हजारांनी ही संख्या वाढली आहे. तसेच चारचाकीसह बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
पेट्रोल, डीझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. तर सीएनजीचे भावही नव्वदीच्या घरात आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. शहरात यंदा गेल्या मागील पाच वर्षांतील उच्चांकी ई-दुचाकी खरेदीची नोंद आरटीओकडे झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2022 काळात 23 हजार 23 इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर उतरल्या. तर यंदा मध्ये एकूण 29 हजार 967 ई-दुचाकी रस्त्यावर उतरल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) आकडेवरीतून समोर येते.
यावर्षी ई- दुचाकी खरेदीमध्ये 6 हजार 944 ने वाढ झाली आहे. तर चारचाकी वाहनांमध्ये जवळपास 311 ने वाढ झाली असून, बस, गुड्स, आणि टॅक्सीच्या खरेदी संख्येतही वाढ झाली. मात्र, आॅटो रिक्षाच्या खरेदी संख्येत काहीशी घट झाली आहे. दरम्यान, अचानक दुचाकी पेट घेणे, तांत्रिक बिघाड आणि अन्य तक्रारींमुळे इ-दुचाकी खरेदीकडे कल कमी होता. मात्र, नवीन माॅडेल, आग लागण्याच्या घटना कमी आणि शहराच्या शहरात फिरण्यासाठी उत्तम वाहन यामुळे पुणेकरांनी ई-वाहन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून येते.
ई-वाहन खरेदी तपशील
वाहनाचा प्रकार वर्ष 2022 वर्ष 2023
दुचाकी 23 हजार 23 29 हजार 967
चारचाकी 1 हजार 868 2 हजार 179
बस 256 138
आॅटो रिक्षा 47 43
गुड्स 325 614
टॅक्सी 106 470