निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप असणाऱ्या पिपंरी चिंचवडमधून निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर रशियन महिलेवर बारा वर्षे बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिसा वाढवून देण्यास मदतीच्या बहाण्याने जाधवने तिचा पासपोर्ट घेत जवळीक साधली. २००४ पासून १२ वर्षे तिच्यावर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तो देत असे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

काश्मिरी तरुणी दाखवून, फिरोजा खान नावाने त्याने तिला खोटे पुरावे तयार करून दिले. ती विरोधात जाऊ नये म्हणून अली नाव धारण करून धर्म बदलत तिच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर तिने मुलाला जन्म दिला. मुलाला एका नातेवाईकाकडे ठेवत त्याने तरुणीला पुन्हा रशियात पाठविले. १२ वर्षांत जाधवने मारहाण केली, अनेकदा कैद करून ठेवल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

जाधव हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होता. गेल्या महिन्यातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली. तेव्हा त्याने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला निलंबित केले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.