रांजणगाव गणपती -गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील मुंबईहून गावात आलेल्या करोना संशयिताचा शासकिय अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉं. स्नेहल घोडेवार यांनी दिली.
प्रकृतीत बिघाड झाल्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर त्याची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आला. पिंपरी येथील वायसीएमचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर कुटुंबातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.