मुंबई – काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची फिट अभिनेत्री ‘सुष्मिता सेन’ला ह्रदयविकाराचा झटका आला असून त्यानंतर तिच्यावर अँजेओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती स्वतः सुष्मिताने पोस्ट करून दिली होती. आपल्या चांगल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या 47 सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. सध्या तिच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असल्याचंही दिसून येत आहे.
View this post on Instagram
नुकतंच अभिनेत्री लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर उरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिचा ग्लॅमर्स आणि स्टाईलिश अंदाज पाहून सर्वांनीच तीच कौतुक केलं. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा भरजरी लेहंगा आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले होते. सुष्मिताच्या रॅम्प वॉकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘आयुष्य साजरं करणारी अभिनेत्री..’ असे कमेंट्स करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, हार्ट सर्जरीनंतर सुष्मिता पहिल्यांदाच कोणत्या तरी कार्यक्रमात दिसून आली आहे. त्यामुळे सर्वांनीच तिला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.