मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘रिया चक्रवर्ती’ पुन्हा एकद चर्चेत आली आहे. रियाने एकदा एमटीव्हीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, तर आता ती पुन्हा एकदा ‘रोडीज सीझन-19’मध्ये जज बनून तिची नवी इनिंग सुरू करत आहे.
शोमध्ये रिया चक्रवर्तीच्या एंट्रीचा प्रोमो रिलीज झाला आहे, मात्र याच दरम्यान सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंगने ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही, पण ज्या पद्धतीने हे ट्विट केले आहे, त्यावरून ते फक्त रिया चक्रवर्ती यांचेच असल्याचे युजर्सला वाटत आहे. प्रियंका सिंगचे हे ट्विट वादग्रस्त आहे, कारण तिने त्यात ‘वेश्या’ हा शब्द वापरला आहे.
प्रियंका सिंगचे हे ट्विट रिया चक्रवर्तीशी का जोडले जात आहे ते तिच्या भाषेमुळे. खरं तर, ‘रोडीज 19’ च्या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती म्हणते, ‘तुला काय वाटतं, मी परत येणार नाही, मला भीती वाटेल?’ तिच्या या प्रोमो व्हिडिओवर आता प्रियंका सिंहने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हिंदीत लिहिले, ‘तू कशाला घाबरणार? तू वेश्या होतीस, तू आहेस आणि नेहमीच राहशील! प्रश्न असा आहे की तुझे ग्राहक कोण आहेत? ही हिंमत सत्ताधारीच देऊ शकते.’ असं म्हणत तिच्यावर सडकून टीका केली आहे.
एमटीव्हीने ‘रोडीज-19’ मध्ये रिया चक्रवर्तीची नवीन गँग लीडर म्हणून ओळख करून दिली आहे. प्रोमो रिलीज करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘सावधगिरी बाळगावी की घाबरावे?’ व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्ती म्हणते, ‘तुला काय वाटले, मी परत येणार नाही. मला भीती वाटेल! घाबरण्याची पाळी दुसऱ्याची आहे. ऑडिशनला भेटू. असेही ती म्हणाली आहे.