मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील क्रिकेटपटूंनी दुःख व्यक्त केलंय.
विराट कोहली..
सुशांत सिंह याच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला.त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.
Shocked to hear about Sushant Singh Rajput. This is so difficult to process. May his soul RIP and may god give all the strength to his family and friends 🙏
— Virat Kohli (@imVkohli) June 14, 2020
रवि शास्त्री …
माजी क्रिकेटर रवि शास्त्री यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे की, सुशांत सिंहच्या जाण्याने मला मोठा धक्का बसलाय. त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.
I’m shocked at the tragic passing away of #SushantSinghRajput. A life brimming with promise and possibilities ended abruptly. My condolences to his family and fans 🙏 pic.twitter.com/8g1VCY0Kne
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 14, 2020
सचिन तेंडूलकर…
सुशांत सिंह याच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला. तो युवा आणि प्रतिभावान अभिनेता होता.त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो
Shocked and sad to hear about the loss of Sushant Singh Rajput.
Such a young and talented actor. My condolences to his family and friends. May his soul RIP. 🙏 pic.twitter.com/B5zzfE71u9— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 14, 2020
विरेंद्र सेहवाग..
त्याचप्रमाणे विरेंद्र सेहवागने देखील सुशांतच्या अशा अचानक जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.
Life is fragile and we don’t know what one is going through. Be kind. #SushantSinghRajput Om Shanti pic.twitter.com/zJZGV96mmb
— Virender Sehwag (@virendersehwag) June 14, 2020
युवराज सिंग..
सुशांत सिंहने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. तो एक युवा आणि प्रतिभाशाली अभिनेता होता.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1272107154816679936?s=19
हरभजन सिंग..
या दुख:द घटनेवर हरभजन म्हणतो, कोणीतरी मला सांगा की ही बातमी खोटी आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की सुशांत सिंह या जगात नाही.त्याच्या कुटुंबीयासोबत माझ्या संवेदना आहेत.
Plz tell me this is a fake news.. Cant believe Sushant Rajput is no more..Condolence to the family🙏🙏 Very sad #ripsushantsinghrajput pic.twitter.com/wjCK77aq3t
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 14, 2020
विनोद कांबळी ..
माजी क्रिकेटर विनोद कांबळी याने देखील ट्विट करत दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, सुशांत सिंहने आत्महत्या केल्याची ऐकून दुःख झालं. त्याने आत्महत्या केली यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्याने एमएस धोनी चित्रपटात केलेली भूमिक मला खूप आवडली होती. त्याला भावपूर्ण श्रद्धाजली.
This is unbelievable! Saddened to hear this news. Such a talented and loved actor. I personally loved his acting in MS Dhoni film. May his soul rest in peace and condolences to his loved ones! 🙏💔#SushantSinghRajput pic.twitter.com/CEaYEZak6F
— Vinod Kambli (@vinodkambli349) June 14, 2020