मुंबई: सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत केलेल्या 81 धावांच्या वादळी खेळीने मुंबईने हरियाणाचा 8 गडी राखून पराभव करत सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सहज विजय नोंदविला.
हरियाणाला प्रथम फलंदाजी देऊन मुंबईने त्यांचा डाव 5 बाद 153 धावांवर रोखला. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने पहिला गडी लवकर गमावला.
मात्र त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने हरियाणाच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढविला. त्याने 11 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने केवळ 38 चेंडूंत 81 धावांची वादळी खेळी केली.
सूर्यकुमारने सिद्धेश लाडच्या साथीत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली व विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईने 16 व्या षटकांतच 2 गडी गमावून 154 धावा करत सामना जिंकला.