Supriya Sule | Pawar Family : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर नंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन वेगळे गट तयार झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर पक्षाचं घड्याळ चिन्हंदेखील अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे. पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, अश्यातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. “सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, असं मोठं वक्तव्य केलं आहे.
आज समाज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमच्या पक्षामध्ये अजूनही फूट नाही आणि पवार कुटुंबातही नाहीच. कोणी कसा वागायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न… लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे.. आपण आपल प्रोफेशनल आयुष्य आणि आपल खाजगी आयुष्य मिक्स करु शकतं नाही. एवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे’. असं त्या यावेळी म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणतात… । Supriya Sule । Ajit pawar
अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही. लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे. माझे सगळ्यांशी मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहे.
कुणाशीही माझे मनभेद नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. प्रत्येकाला मत मांडायचा आणि मन मोकळा करायचा अधिकार आहे. प्रत्येकाची स्टाईल असते. असं त्या यावेळी म्हणाल्या.