Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे. ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत.
दरम्यान, काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार (ajit pawar) गैरहजर राहिल्यानंतर आज काटेवाडीत भाऊबीज साजरी करण्यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले आहे. सुप्रिया सुळे (supriya sule) आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी त्यांनी आपला भाऊ अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी केली आहे.
राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओत सुप्रिया सुळे आपल्या इतर बहिणींसमवेत अजित पवारांना एकत्रित ओवाळताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना ओवाळल्यानंतर त्यांच्या पायाही पडल्या आहेत.
बहिण-भावाच्या या अनोख्या नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणतात… “भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज… या सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असं कॅप्शनही सुप्रिया सुळे यांनी लिहिलं