कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा 

नवी दिल्ली – कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या अपात्र आमदारांना पोटनिवडणूक लढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यामुळे बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांमध्ये १४ काँग्रेसचे आणि ३ जेडीएसचे आहेत. विधानसभेचे तत्कलीन अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांचा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवत पोटनिवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांची बंडखोरी त्या मित्रपक्षांना भोवली. त्यांचे आघाडी सरकार बंडखोरीमुळे कोसळले. विधानसभेचे तत्कलीन अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांनी त्या बंडखोरांना दणका देत त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले. त्यातील रमेश एल.जारकीहोली आणि महेश कुमाथल्ली या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांनी त्या निर्णयाला आव्हान दिले आहे. अपात्र आमदारांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने या अपात्र आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. निकालादरम्यान रमेश कुमार यांचा निर्णयही कायम ठेवला असून अपात्रता अनिश्चित काळासाठी लागू होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केल्याने सतरातील १५ जागांवर ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here