सुपरशेअर – एशियन पेंट्स

गुंतवणूक सहज सोपी करण्याच्या उद्देशानं परिचित अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या, ज्यांची उत्पादनं सर्वमान्य ज्याची लोकप्रियता पुढील चार-पाच वर्षं टिकून राहू शकते अशाच कंपन्या निवडाव्यात. अशीच एक कंपनी म्हणजे एशियन पेंट्स. कांही कंपन्यांचं ठराविक असं एक चक्र असतं, त्या ठराविक काळात त्या कंपनीच्या विक्रीचे आकडे उत्तम येत असतात.

अगदी नवीन घराची मागणी घसरलेली आहे व त्यास फारसा उठाव नसल्याचं गृहीत धरलं तरी जसं, एशियन पेंट्सच्या बाबतीत सणासुदीचा काळ व लग्नसराईचा काळ म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी. बहुतेक याच काळात लोक सर्वांत जास्त रंगरंगोटीची कामं करताना दिसतात. त्यात आता या वर्षी बहुतांशी भारतात पुरानं धुमाकूळ घातल्यानं बहुतेक प्रत्येक घर हे रंगवलं जाणार हे नक्कीच, अगदीच नाही म्हटलं तरी डिस्टेम्परनं तरी. त्यामुळं याच कयासानं मागील सलग काही आठवडे हा शेअर आपल्या सर्वोच्च भावात व्यवहार करत सुपरशेअर ठरतोय. त्यातच कंपनीनं म्हैसूर व विशाखापट्टणम येथे प्रत्येकी वार्षिक ३,००,००० केएल उत्पादन करू शकणाऱ्या दोन मोठ्या पेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स देखील चालू केल्या आहेत.दीर्घ मुदतीसाठी या कंपनीत गुंतवणूक केल्यास परताव्यासोबत समाधान देखील देणारी ही कंपनी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.