यवत – येथील एका दुकानात बनावट एशियन पेंन्टची विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत कारवाईची मागणी केल्याने यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्मराज गंपले व पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह भुलेश्वर मार्केट येथील नितीन अशोक जगदाळे (वय 42, रा. जगदाळेवस्ती, भरतगाव) यांच्या भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर या दुकानाची पाहणी केली.
दुकानामध्ये एशियन पेंन्टच्या 23,850 रुपये किंमतीच्या पावती नसलेल्या 9 बादल्या आढळून आल्या. अधिक तपास करता स्टेशन रोडवर असलेल्या गोडावूनमध्ये एशियन पेंन्टस कंपनीच्या बनाबट स्टिकर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 20 लिटरच्या एकूण 111 बादल्या व 102 बनावट स्टिकर असा 78 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.