पाकिस्तामध्ये जाणारे पाणी अडवणार – मोदी

चंदिगढ – पाकिस्तानला जाणार पाणी रोखणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत.

हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचं सांगितल. ३७० कलमबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

“जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.