काँग्रेसकडून डॉ. आंबेडकर, सावरकर यांचा अपमान : मोदी

अकोला – भारतरत्न पुरस्कार नाकारून काँग्रेसने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यांनी वीर सावरकर यांचाही अपमान केला. आणि आता निर्लज्ज विरोधक ३७० कलम का हटवले असे विचारात आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते. आजही त्यांच्या भाषणाचा मुख्य रोख काश्मीर, ३७० कलम हाच होता. त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.

राजकीय स्वार्थसाठी काही लोक महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबंध आहे ? काय घेणदेणं आहे ? असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नसेल की तिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिलेले नाही. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला दहा दशकं मागे ढकलून दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आज अकोल्यामध्ये महायुतीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना लाज नाही, त्यामुळे ते खुलेपणाने विचारत आहेत की काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध काय?. अशा लोकांना माझ सांगण आहे की जम्मू-काश्मीरचे लोकही भारत मातेची मुल आहेत. महाराष्ट्रातील जवानांनी काश्मीरमध्ये शत्रूंशी लढा दिला. कारण त्यांना माहिती होत आपण शिवाजी महाराज्यांच्या राज्यातून आलो आहोत.

या विश्वासानेच त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन बलिदान दिले. आम्हाला राज्यातील या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. मात्र, आज केवळ आपल्या कुटुंबाचे पोषण करणारे राज्यातील लोक विचारतात की, राज्याचा जम्मू-काश्मीरशी संबंध काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या विधानावर लाज वाटायला हवी. त्यांनी बुडून मराव असा टोला त्यांनी कॉंंग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here