बॉलीवूड अभिनेता सनी देओल लवकरच त्याचा बिग बजेट असलेल्या “चुप ः रिव्हेंज ऑफ द आर्स्टिस्ट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओलसह पूजा भट्ट आणि दुलकर सलमान मुख्य भूमिका साकारणार आहेत.
सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटरवर या चित्रपटाचा टीझर चाहत्यांशी शेअर केला आहे. या टीझरवरून हा चित्रपट निर्माता गृरू दत्त यांच्याशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. या टीझरमध्ये त्यांचा फोटो आणि त्यांच्या “प्यासा’ चित्रपटातील “ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये ऐकू येते.
बॉलीवूडमधील अनेक सेलेब्सनेदेखील या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनीही एक पोस्टर शेअर करत लिहिले की, “चुप… मोशन पोस्टर.’ याशिवाय अक्षय कुमारनेही हा टीझर शेअर करत लिहिले की,
“हे पाहिल्यानंतर आपण चुप राहू शकणार नाही. मलाही अनेक प्रश्न पडले आहेत. काय शानदार पोस्टर आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा आर. बालकी यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे.