Sunny Deol – बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 500 कोटींहून अधिक या चित्रपटाने कमाई केली. ‘गदर’ प्रमाणेच ‘गदर 2’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
80-90 च्या दशकात सनी देओलने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर, दुसरीकडे मात्र सनी पाजी चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी सनीवर टीका केली आहे.
Sunny Deol kaha ghoom raha raat ko? pic.twitter.com/L3Yz5bLRhW
— . (@single_soul1) December 5, 2023
सनी देओल मुंबईच्या जुहू सर्कलमध्ये रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओतही दिसते की सनी पाजी फुल टल्ली होऊन रस्त्यावर फिरत आहे.
तो एका ऑटोला (रिक्षा) धडकणार इतक्यात त्या ऑटो चालकाने त्याला ओळखले आणि त्याची मदत केली. यानंतर त्या रिक्षा चालकाने सनीला पकडून ऑटोमध्ये बसवले. अभिनेत्याचा हा अवतार पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
दरम्यान, आता या व्हिडिओ मागचे सत्य समोर आले असून सनी देओलचा हा व्हायरल व्हिडीओ त्याच्या ‘सफर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधील आहे. स्वत: सनी देओलने याबद्दल माहिती दिली आहे.
Afwaahon ka ‘Safar’ bas yahin tak 🙏🙏#Shooting #BTS pic.twitter.com/MS6kSUAKzL
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2023
सनीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, “अफ़वाहों का ‘सफ़र’ बस यहीं तक” असं म्हणाला आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.