बँक ऑफ बडोदा भर्ती 2023: बँक ऑफ बडोदाने वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 06 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. (bank job)
किती आहेत जागा ?
बँक ऑफ बडोदाच्या या भरती मोहिमेमध्ये एकूण 250 वरिष्ठ व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत. 28 ते 37 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वरच्या वयात सूट देण्याची तरतूद लागू आहे. ( Bank of Baroda jobs )
बँक ऑफ बडोदा जॉब्स अर्ज फी ?
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 600 रुपये आहे. SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. ( Bank of Baroda Recruitment 2023 )
बँक ऑफ बडोदा परीक्षेचे स्वरूप
बँक ऑफ बडोदामधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेत 150 प्रश्न असतील आणि कमाल 225 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 150 मिनिटे आहे.
BoB भरती शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/एमबीए (मार्केटिंग आणि वित्त) किंवा समकक्ष व्यावसायिक पात्रता सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान ६०% गुणांसह असणे आवश्यक आहे.