अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टीने यावर्षी जानेवारी महिन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलसोबत लग्न केले. अथियासोबत सुनील शेट्टीचेही त्याच्या जावयावर प्रेम आहे. सासरे आणि जावई यांचे एकमेकांशी खूप चांगले नाते आहे. अशात पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातील बॉण्डिंग सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
आपल्या जावयाबद्दल चिंता व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘जर कोणी राहुलला ट्रोल केले तर मला खूप वाईट वाटते. जेव्हा कोणी राहुलबद्दल वाईट बोलतात, तेव्हा मला राहुल आणि अथियापेक्षा जास्त त्रास होतो. पण राहुल मला नेहमी समजावतो आणि म्हणतो की पापा, या सगळ्या गोष्टी मनावर घेऊ नका. माझी बॅट बोलेल.’
सुनील शेट्टी पुढे म्हणाले की, ‘मी क्रिकेटमध्ये खूप सुपर टिशियस आहे. राहुल जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा मी खूप घाबरून जातो. शेवटी तो माझा मुलगा आहे. त्याने जिंकावे असे मला नेहमीच वाटते. जेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहतो तेव्हा मला जाणवते की ही गोष्ट किती मोठी आहे. जर तुमचे मूल चांगले प्रदर्शन करू शकत नसेल, तर तुम्ही आतून काळजीत पडता. मला माहित आहे की राहुल संपूर्ण जगासाठी एक महान खेळाडू आहे पण मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे पाहतो.’ असं म्हणत सुनील शेट्टीने मुलाखतीत भावना व्यक्त केली. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.