kushi kapoor : दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरचा देखील समावेश आहे. खुशी कपूरचा पहिलाच चित्रपट ‘द आर्चीज’ 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. ‘द आर्चिज’ चित्रपटानंतर आता खुशी एका नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात खुशी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात खुशी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार,या सिनेमात इब्राहिम आणि खुशी कपूर रोमान्स करताना दिसणार आहेत. निर्माता करण जोहर रोम-कॉम चित्रपटाच्या तयारीत आहे. याच सिनेमात मुख्य लीड स्टार कास्टमध्ये इब्राहिम आणि खुशीच्या नावाची चर्चा आहे.
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल आणि निर्माते OTT प्लॅटफॉर्मशी चित्रपट स्ट्रीमिंग अधिकारांबाबत सध्या बोलत आहेत. खुशी आणि इब्राहिम यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शौना गौतमकडे आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते. या चित्रपटाचे टायटल अद्याप समोर आलेले नाही. खुशी कपूरने ‘द आर्चिज’ चित्रपटातून डेब्यू केला आहे. त्याचबरोबर इब्राहिम अली खान चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘सरजमीन’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांचा हा दुसरा चित्रपट असेल.
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिक जोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून किंग खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हे तिघेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील या तिघांच्याही अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.