Sunetra Pawar | Sharad Pawar। देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.
त्यात सर्वात चर्चेत असणार मतदारसंघ म्हणजे बारामती. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार आता मैदानात उतरले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. । Sunetra Pawar | Sharad Pawar
अश्यातच, ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता केली अन् लेक अन् सुनेत केलेल्या फरकावरून नवा वाद सुरु झाला आहे. आता यावर स्वतः सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘मी मतदारसंघात फिरतेय, मला खात्री आहे चांगल्या लीडने मी विजयी होणार, गेल्या 25 वर्षांपासून मी समाजकार्यात आहे. भोरमधील एमआयडीसी आणि पुरंदरमधील विमानतळाचा विषय मी मार्गी लावणार आहे.
अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांची भाषा मला नक्की समजते, त्यामुळे मतदारांचे प्रश्न मी संसदेत नक्कीच मांडणार’. असं त्या म्हणाल्या.
शरद पवारांना दिलं प्रत्युत्तर –
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, “मी एकटी नाही, बारामती माझं कुटूंब आहे, बारामतीकर माझं कुटूंब असणार आहे, त्यामुळे मी कुठेही एकटी नाहीय. निवडणुका या तेवढ्या पुरत्या असतात,
मात्र निवडणूका संपल्यावर संबध सुधारू शकतात. शरद पवार जरी कुणाला भेटत असतील, तर मी पण भेटत असते’. असं देखील सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. । Sunetra Pawar | Sharad Pawar