नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका अझलन शाह हाॅकी स्पर्धेलाही बसला आहे. करोना विषाणू संसर्गाच्या चिंतेमुळे ही स्पर्धा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
स्पर्धेचे यजमानपद हे मलेशियाकडे असून इपोह शहरात ही स्पर्धा 11 ते 18 एप्रिल दरम्यान होणार होती. पण, करोना विषाणू संसर्गाच्या चिंतेमुळे ही स्पर्धा आता 24 संप्टेबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
दरम्यान, यामुळे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्वाच्या मानल्या जात असलेल्या जर्मन ओपन आणि पोलंड ओपन या बॅडमिंटन स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही महिन्यात या विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाला नाही तर, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीही शक्यता आहे. तसेच, बिशकेक (किर्गिझस्तान) येथे होणारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललण्यात आली आहे.