जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे गावात मैत्रीदिनीच्याच दिवसी एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमविवाहाला नकार दिल्यामुळे या प्रेमीयुगुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुकेश कैलास सोनवणे, वय- 22, नेहा बापू ठाकरे, वय-19 असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. आत्महत्येनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी या जोडप्याचे लग्न स्मशानभूमीत लावून देत त्यांचे अंतीमसंस्कार केले.
नेहा आणि मुकेश यांची वाडे येथे ओळख झाली त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत झाले. आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यांच्या नात्याची खबर दोघांच्याही कुटुंबीयांना लागली. त्यानंतर मुकेशच्या कुटुंबीयांकडून नेहाच्या घरच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र मुकेश हा नेहाचा नात्यानं चुलत मामा लागत असल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. न नेहाला स्थळ शोधायला सुरुवात केली. यामुळे या दोघांनी आत्महत्या केली.