आईची हत्या करून दिल्लीत प्राध्यापकाची आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टिफन महाविद्यालयातील एका प्राध्यापकाचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला. तर त्यांच्या आईचा तोंड बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत म्रतदेह त्यांच्या घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ऍलन स्टॅनले(वय 27) हे केरळमधील कोट्टयम येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह सराई रोहिला रेल्वे स्थानकाजवळ रूळांवर आढळला. तर त्यांच्या आई लिसी (वय 55) यांचा तोंड बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या आशियाना अपार्टमेंटस्‌ येथील सदनिकेत मृतावस्थेत आढळल्या. स्टेनले हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तर अन्य संस्थेतून ते पीएचडी करत होते. त्यांनी त्यांच्या आईची हत्या करून मग आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मात्र त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही आत्महत्येची चिठ्ठी सापडली नाही.

लिसी यांचे एक नातेवाईक त्यांच्याकडे रविवारी दुपारी गेले होते. मात्र दार वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पोलिसांशी संपर्क साधला पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्टॅनले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही. त्यावेळी स्टॅनले यांच्या मित्राने लावलेल्या फोनवर रेल्वे पोलिसांनी त्याला मृत्यूची माहिती दिली.

हे माय लेक दोघेही नैराश्‍याने ग्रासले होते. त्यांच्यावर केरळमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यात ते जामीनावर बाहेर आले होते. स्टीनले यांनी आईला आत्महत्या करण्यासाठी पाच दिवसांपुर्वी सुचवले होते. मात्र त्यांनी त्याला नकार दिला होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

लिसी यांचा एका लष्करी अधिकाऱ्याशी विवाह झाल होता. मात्र, त्यांच्या पतीचा मृत्यू 2014मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी दुसरा विवाह केला. या पतीचा 2018मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूबियांनी लिसीनेच त्यांना आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांच्यावर खटला सुरू आहे. तो रद्द करण्याची याचिका उच्च न्यायलयाने फेटाळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.