पिंपरी : स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांना मारहाण करण्यात आली आहे. आपल्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यावर हल्ला झाला. ही घटना मतदानाच्या दिवशी सोमवारी दुपारी पिंपरी येथे घडली.
डब्बू आसवानी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तिथे असलेल्या आसवानी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोर मोटार सोडून पळून गेले. या घटनेमुळे पिंपरी परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत प्रतिस्पर्धी गटातील काहीजण जखमी झाल्याचे समजते. युतीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आसवाणी यांनी केला आहे. घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. यामुळे पिंपरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणीअज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.