उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासमवतेत मुंबईतील बांद्रा पूर्वमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले आदित्य आणि तेजस ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी माझ्या कुटुंबासोबत आता मतदान केले आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क जरूर बजावला पाहिजे, मतदान केले पाहिजे. हे मतदान फक्त राजकारणासाठी नाही तर ते एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी आहे. यावेळी पहिल्यांदाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.