Suhani Bhatnagar । अभिनेता आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘दंगल’मध्ये लहान बबिता फोगटची भूमिका सुहानीने साकारली होती. सुहानी काही दिवसांपासून आजारी होती. सुहानीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत आणि सुहानीने अवघ्या 19 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’चा भाग झाल्यानंतर सुहानीला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात सान्या मल्होत्रानेही काम केले होते. अशा स्थितीत आपल्या सहकलाकाराच्या निधनाच्या वृत्तावर सान्या मल्होत्रानेही शोक व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. । sanya malhotra
View this post on Instagram
सुहानी भटनागरच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करताना सान्या मल्होत्राने लिहिले की, “मला हे खरे आहे यावर विश्वास बसत नाही. आमच्या सुहानीसारखी कोणीही नव्हती. ती खूप खास, प्रतिभावान होती आणि लहान वयातच आम्हाला सोडून गेली. छोटू तुझ्या आत्म्याला शांती लाभो. पूजा, पुनीत आणि सर्व कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना.” असं अभिनेत्री म्हणाली आहे.
आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून जायरा वसीम, बबिता फोगट आणि दंगलचे दिग्दर्शक नितीश तिवारी यांनीही शोक व्यक्त केला. तसेच, बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुहानी भटनागरची शेवटची पोस्ट – Suhani Bhatnagar
View this post on Instagram
सुहानी भटनागरची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत असून ती चर्चेचा विषय बनली आहे. सुहानी भटनागरने या पोस्टमध्ये काही अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर टाकले होते. आणि कॅप्शनमध्ये नोव्हेंबर ? असं लिहिलं होत. सुहानीच्या जाण्यानंतर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी या कॅप्शनचे वेग वेगळे अर्थ काढायला सुरुवात केली आहे.