आमदार संग्राम थोपटे यांची माहिती
भोर – राजगड सहकारी साखर कारखाना सभासदांना सवलतीच्या दरात आजपासून (दि.1) वाटप करीत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
राजगड सहकारी साखर कारखाना प्रतीवर्षी सणासुदीच्या दिवसात सभासदांना साखर वाटप करतो.त्यानुसार दि.1 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत कृषि उत्पन्न बाजार समिती-भोर, खरेदी विक्री संघ-नसरापुर, शिरवळ (ता.खंडाळा), भादे (ता.खंडाळा) व पुणे येथे हे वाटप करण्यात येणार असून ऊस उत्पादक सभासदास 15 किलो, बिगर ऊस उत्पादक सभासदास 9 किलो या प्रमाणे प्रती कि.ग्रॅ. रु.20/- दराने सवलतीच्या दरात हे साखर वाटप केले जाणार आहे.
सभासदाला या साखर वापटा वेळी सभासद असल्याची ओळख द्यावी लागणार असून मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड, सभासद कार्ड या सारख्या पुराव्यांचा यात समावेश असेल. या पैकी एक कोणताही पुरावा सादर करणाऱ्या सभासदास साखर वाटपाचा लाभ दिला जाईल, असे कार्यकारी संचालक रावसाहेब दुधाणे यांनी सांगितले.