स्यू की यांनी केले लष्करी कारवाईचे समर्थन

बॅंकॉक :  म्यानमारच्या सरकारी समन्वयक आंग सान स्यू की यांनी हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामधील सुनावणीदरम्यान म्यानमारच्या सैन्याने रोहिंग्यांविरोधात केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यामुळे एकेकाळी शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या स्यू की यांच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायच बुचकळात पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

एकेकाळी स्यू की यांच्याकडे आपल्या देशातील लष्करी हुकुमशाही विरोधात मानवाधिकारांचे जोरदार समर्थन करण्यासाठी जगभरातील कार्यकर्त्यांकडून आदराने बघितले जात होते. मात्र आता त्याच स्यू की मानवाधिकारांची सरळसरळ पायमल्लीचे समर्थन करत आहेत, अशी टीका आंतरराष्ट्रीय समुदायाकडून करण्यात येत आहे.

म्यानमारचे सैन्य वांशिक हत्याकांडात लष्करी दोषी आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांनी असे म्हटले होते. तर म्यानमारने मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे नाकारले आहे. सुरक्षा दलांच्या डझनभर सदस्यांना ठार करणाऱ्या अतिरेक्‍यांच्या हल्ल्‌याला प्रतिसाद देणारी ही कारवाई होती, असे स्यू की यांनी हेगच्या कोर्टात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.