आसामात गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

संचारबंदी झुगारत निदर्शक रस्यावर, मंत्र्याच्या घरावर हल्ला, नमावंत आंदोलनात सहभागी

गुवाहाटी : संरक्षण दलांनी पुकारलेली संचारबंदी अक्षरश: धुडकावून लावत हजारो नागरिक येथे रस्त्यावर उतरले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. मात्र तरीही निर्भयीपणाने नागरिकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) आपला विरोध दर्शवला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसाममध्ये तीन जण मरण पावले. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे. आसामचे हातमाग मंत्री रणजीत दत्त यांच्या निवाससथानावर सोनीतपूर जिल्ह्याती बेहाली येथे हल्ला करण्यात आला. आसाम गण परिषद आणि भाजपाच्या नेत्यांवर आंदोलकांचा विशेष रोष आहे.

दत्त यांच्या घराबाबहेर निदर्शकांचा मोठा जमाव जमला. त्यांनी दगडफेक सुरू केली. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत लाठीमार करुन आंदोलकांना पिटाळल्याने फारसे नुकसान झाले नाही.

गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालताने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार एका मृत व्यक्तीला आणण्यात आले. तर दुसऱ्याचा मृत्यू उपचार सुरू असताना झाला. मात्र मृतांची ओळख रात्री उशीरापर्यंत पटू शकली नव्हती. दीपांजल दास असे कामरुप जिल्ह्यात मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे. या मृत्यूनंतर मुख्यमत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता संचारबंदी जारी करण्यात आली. मात्र आज सकाळी सर्व चौकात आणि रस्त्यावर लाखो तरूण उतरल्याचे चित्र होते.

जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी गुवाहाटीच्या लालुंग भागात पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याशिवाय पोलिसांनी शहराच्या अनेक भागात गोळीबार केला. गुवाहाटी शिलॉंग महामार्गाला तर युध्दभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांनी दुकाने आणि इमारतींची नासधुस सुरू केली. जागोजागी टायर्स पेटवले. सुरक्षा दलांशी अनेक ठिकाणी चकमक उडाल्याचरे चित्र होते.

गोलाघाट, तीनसुखीया, विश्‍वनाथ, शिवसागर बोंगीयागाव अशा सर्वच ठिकाणी पोलिस आणि सुरक्षा दलांशी निदर्शकांची चकमक उडाली. एकट्या गुवाहाटीत 100 पेक्षा अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. सिलपुखरी, वशिष्ठ, लाचितनगर, हातीगाव गणेशगुरी भागात गोलीबार घडल्याचे वृत्त आहे. आसाम सचिवालया जवळ पोलिस आणि लष्कराची वाहने पेटवून देण्यात आली.

लाटाशील क्रीडांगणावर आसू आणि केएमएसएसने मेळावा निमंत्रीत केला होता. त्याला शेकडोंच्या संख्यने विद्यार्थी आणि तरूण उपस्थित होते. त्यात जूईन गर्ग यांसह अनेक नामवंत सहभागी झाले होते. हे विधेयक मंजूर करून आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या जनतेवर सुड उगवत आहेत, अशी टीका आसूचे सल्लागार समुज्जल भट्टाचार्य यांनी यावेळी केली. या मेळाव्यात या कायद्याच्या निषेधार्थ दरवर्षी 12 दिसेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार व्यक्त करण्यता आला.

राष्ट्रीय महामार्ग 31 कामरूप जिल्ह्यात रोखण्यात आला. निदर्शकांनी दगडफेक सुरू केल्याने रंगिया तालुक्‍यात गोळीबाराच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करण्यात आला. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. गुवाहाटी, तीनसुखीया, जोरहाट आणि दिब्रुगढ येथे लष्कराने ध्वचज संचलन केले.

भारतीय लष्कराच्या आणखी पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या असून त्यांनी ध्वजसंचलन केले. नवनियुक्त पोलिस महासंचालक भास्कर ज्योती महंत म्हणाले, परिस्थिती खूपच वाईट आहे. तरूणांच्या पालकांनी आपल्या मुलांना निदर्शनामध्ये सहभागी होऊ देऊ नये, असे मी आवहन करत आहे. या आंदोलनाची चित्रे दाखवू नयेत असे आवहन माध्यमांना करत आहे. महंत यांचा आसाम पोलिस मुख्यालयाकडे जाणारा ताफा निदर्शकांनी रोखला आणि त्यांना परत जायला भाग पाडले.

भारतीय जनता पक्ष आणि आसाम गण परिषदेच्या नेत्यांवर आंदोलकांचा विशेष रोष आहे. आसाम गण परिषदेच्या गुवाहाटीतील अंबारी भागातील कार्यालयावर निदर्शकांनी दगडफेक केली. तेथे असणारी पोलिसांची वाहने पेटवून दिली. बोनगायगाव, धाकुखाना आणि शिवसागर येथे भारतीय जनता पक्षाची कार्यालये पेटवण्याचा प्रयत्न झाला. शेतकररू नेते नंदन देवनाथ यांना अटक केली.मात्र निदर्शकांनी जोर लावल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

भाजपा आमदार पद्म हजारिका यांचे घर उद्‌ध्वस्त करण्यात आले. गुवाहाटीत खासदार क्विन ओझा एोंच्या घरात घुसून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. दिगर्बोइमधील भाजपाच्या 200 कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आसाम गंण परिषदेचे ज्येष्ठ नेते वृदावन गोस्वामी आणि अमीय महंता यांनी पक्षाचा राजीनाम दिला आहे. मोरान आणि गोलाघाट येथीलराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय पेटवूनब देण्यात आले.

1980च्या दशकाप्रमाणे या आंदोलनात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 22 दिसेंबर पर्यमत सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 106 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.