असा ओळख हृदयविकार आणि त्याचे गंभीर लक्षणे

पुणे – धाप लागते , श्‍वासोच्छवासाला त्रास होतो , छातीत धडधडते , छातीत दुखते , चक्कर येते  उलटी, मळमळ , हातापायांची शक्ती गेल्यासारखे वाटते, छातीत घट्ट आवळल्यासारखे वाटते. चालताना धाप लागते. एका दमात चालताना, जिने चढताना धाप, दम लागतो. असे असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. पोटात गॅस झाल्यासारखे वाटते. मात्र, असे झाल्यास घरगुती उपाय करून दुखणे कमी झाले नाही तर तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 

छातीत आवळल्यासारखे वाटत असेल तर किमान ईसीजी काढून घ्या.
सारखं सारखं शक्‍ती गेल्यासारखं वाटत असेल तर दुर्लक्ष करू नये.
रक्तदाब व मधुमेह नेहमी नियंत्रणात ठेवा.
आहारात बदल करून मी हृदयविकार टाळू शकतो का?
तर या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच मिळेल. आहारात फळे, फळभाज्या, पालेभाज्या, पूर्ण धान्य (मैदा नाही) साखरेचा कमी वापर मीठाचा प्रमाणात वापर. (पदार्थांत मीठ असताना वरून आणखी घ्यायची सवय मोडा) तंतुयुक्त आहार वाढवला, तळकट तेलकट, तूपकट पदार्थ कमी खाल्ले तर हृदयविकार आपण टाळू शकतो.

रक्तवाहिन्यांत जे चरबीचे थर जमा होतात ते कमी होऊ शकतात व रक्तवाहिन्या रुंद होतात. पूर्वीसारख्या काम करायला लागतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोग होतो म्हणून एकेकाळी हा कोलेस्टेरॉलचा बागुलबुवा केला गेला. परंतु तसे संशोधनात आढळले नाही. साजूक तुपालाही आहारातून रामराम केले गेले. परंतु रोज 2/3 चमचे तूप खायला काहीच हरकत नाही. साजूक तूप हा योग्य प्रक्रिया केलेला पदार्थ आहे. त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.