देवळाली प्रवरा पालिकेच्या विषय समित्या बिनविरोध 

राहुरी फॅक्‍टरी  – देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध झाली. नगरपालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी या निवडीसाठी सहाय्य केले.
देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे.

18 पैकी 16 नगरसेवक भाजपचे आहेत. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आलेले आहेत. विषय समित्यांच्या सभापतीचे निवडीसाठी पक्षीय सदस्यांचे तौलनिक संख्याबळ पाहता सर्वच समित्यांवर भाजप सभापती होणार हे निश्‍चित होते. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन भरण्याची वेळ होती, यावेळेत सभापती पदासाठी एक-एकच नामनिर्देशन पत्र आले. विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली.

नगराध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने व उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे सभापती असल्याने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची स्थायी समितीच्या सभापतिपदी तर उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांची यांची नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समिती सभापती- नगराध्यक्ष सत्यजित कदम, सदस्य- प्रकाश संसारे, सचिन ढूस, सुजाता कदम, केशरबाई खांदे, अंजली कदम, नंदा बनकर.

नियोजन व विकास समिती सभापती- उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,सदस्य- सुजाता कदम, अंजली कदम, नंदा बनकर, सचिन ढूस, केशरबाई खांदे. अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती सभापती- सचिन ढूस, सदस्य- बेबी मुसमाडे, आण्णासाहेब चोथे, कमल सरोदे, उर्मिला शेटे. महिला व बालकल्याण समिती- सभापती अंजली कदम,उपसभापती नंदा बनकर, सदस्य- संगीता चव्हाण, उर्मिला शेटे, कमल सरोदे. पाणी पुरवठा समिती सभापती- सुजाता कदम, सदस्य- ज्ञानेश्‍वर वाणी, आण्णासाहेब चोथे, संगीता चव्हाण, बाळासाहेब खुरूद सार्वजनिक आरोग्य व शिक्षण समिती सभापती- केशरबाई खांदे, सदस्य- आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरूद, ज्ञानेश्‍वर वाणी, संजय बर्डे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.