पुणे – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वारगेट एसटी स्थानकातून सोमवारी पहिला मालवाहतूक करणारा ट्रक रवाना झाला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सुमारे दोन महिन्यांपासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे. याचा एसटीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय शेतकरी, व्यापारी आदींना मालवाहतूक करताना येणारी अडचण लक्षात घेऊन, एसटी प्रशासनाने माल वाहतुकीसाठी एसटीच्या रचनेत बदल करून ट्रकची निर्मिती केली आहे.
पुणे विभागामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यात येते. स्वारगेट आगाराकडे एक ट्रक उपलब्ध आहे. सोमवारी सुमारे सहा टन धान्य, किराणा भुसार घेऊन ट्रक करमाळ्याकडे रवाना झाला, अशी माहिती स्वारगेटचे आगार व्यवस्थापक सचिन शिंदे यांनी दिली.