दारू पिण्यास नकार देणाऱ्या जवानास मारहाण

तोंडात कापडी बोळा कोंबला : रॉड, दांडक्‍यानेही मारले
औंध मिलिटरी स्टेशन येथील प्रकरण
पिंपरी –
दारू पिण्यास नकार दिल्याच्या रागातून लष्कराच्या जवानाला लष्करातीलच चौघांनी हातपाय बांधून बेदम मारहाण केली. तसेच तोंडात कापडी बोळा टाकून लाकडी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजली. ही घटना सोमवार (दि.3) जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास औंध मिलिटरी स्टेशन येथील एफटीएन बॅरेक रुममध्ये घडली.

रमेश मोहनराव बिष्णोई (वय 26, रा. रा. राजस्थान, सध्या रा. औंध मिलिटरी स्टेशन) असे मारहाणीत जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मेजर सोहम सिंग बिस्ट, ले. महिपालसिंग खाती, सुभेदार सुभाष चंद, नाईक सुभेदार विकास मंडल नाईक अधिकारी सर्व रा. औंध मिलिटरी स्टेशन, पुणे यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चौघा आरोपींनी रमेश यांना मिलिटरी स्टेशन येथील एफटीएन बॅरेक रुम क्र. 12 मध्ये बोलवून घेतले व आरोपींनी त्यांना दारू पिण्यासाठी आग्रह केला. यावेळी, रमेश याने दारू पिण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या विकास मंडल नाईक अधिकारी याने रमेश याच्या तोंडात जबरदस्ती दारू ओतली. तसेच लाकडी दांड्याने डोक्‍यात मारून जखमी केले. यावेळी इतर आरोपींनी रमेश यांचे हातपाय बांधून तोंडात कापडी बोळा कोंबला आणि लाकडी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि खाडगे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.