शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरर्बन योजनेअंतर्गत निवड ः जिल्ह्यात फक्त लोणी काळभोरचा समावेश
लोणी काळभोर – शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरर्बन योजनेअंतर्गत लोणी काळभोर ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यात 9 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून गावातील विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आगामी काळात आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी सरपंच अश्विनी गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाल्या, शिरुर- हवेलीचे आमदार पाचर्णे यांच्या प्रयत्नामुळे लोणी काळभोर परिसरातील गावांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरर्बन योजनेअंतर्गत राज्यात एकूण सात गावसमूह (क्लस्टर) बनविले आहेत. यातील पुणे जिल्ह्यात लोणी काळभोर गावसमूह आहे. या समुहात लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी, वळती, तरडे व शिंदवणे गावांचा समावेश आहे. सर्व ग्रामपंचायतींना आगामी काळात 211 कोटी रुपये निधी योजने अंतर्गत विविध विकासकामांसाठी देण्यात येणार आहेत. लोणी काळभोर ग्रामपंचायतींला आगामी काळात एकूण 64 कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. यातील 9 कोटी 20 लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर झाला आहे.
माजी सरपंच वंदना काळभोर म्हणाल्या, मंजूर झालेल्या 9 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे सुरु केली आहेत. विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आगामी काळात आमदार पाचर्णे यांच्या हस्ते होणार आहे.
या निधीतून पुढील कामे करण्यात येणार आहेत. सिद्राम मळा- रामदरा रोड, 1 कोटी, अंबरनाथ ते वलठेवस्ती, 18 फूट रुंद, सिमेंटचा उर्वरित डांबरी रस्ता. रायवाडी रोड – 90 लाख, जुना ते नवा कालवा सिमेंट रस्ता, उर्वरित डांबरीकरण. बाजारमळा- इनामदार वस्ती – 60 लाख, सिमेंट तसेच डांबरीकरण. बाजारमळा रोड ते लिमजाई मळा- 30 लाख- सिमेंट व डांबरीकरण. शांतीकिरण सोसायटी ते अष्टापुरे मळा- 30 लाख, डांबरीकरण. राजबाग ते पाटील वस्ती- 90 लाख, सिमेंट तसेच डांबरीकरण. तरवडी ते रुपनरवस्ती- 60 लाख- डांबरीकरण. रामदरा रोड ते फुरसुंगी रेल्वे स्टेशन- 60 लाख- डांबरीकरण.रामदरा रोड ते केसकर वस्ती- 30 लाख- डांबरीकरण. रामदरा रोड ते ढेले वस्ती- 30 लाख, डांबरीकरण. पाषाणकर बागअंतर्गत रस्ते – सिमेंट कॉंक्रीटीकरण, 80 लाख रुपये. पाषाणकर बाग-बगीचा व सामाजिक सभागृह -25 लाख रुपये. माध्यमिक शाळा स्वच्छतागृह – 12 लाख रुपये. प्राथमिक आरोग्य केंद्र-स्वयंपाकगृह – 10 लाख रुपये. सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशीन- 5 लाख रुपये.