मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी; पकडले चौदा कोटींचे चरस

मुंबई – मुंबई पोलिसांनी काश्‍मीरातून येथे आणण्यात आलेले 14 कोटी 44 लाख रूपयांचे चरस पकडले आहे. एका मोटार कार मधून याची वाहतूक केली जात होती. या प्रकरणात एक इसम, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीला अटक करण्यात आली आहे.

या साठ्याच्या संबंधातील माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दहिसर हायवेवर काल सोमवारी सापळला रचला होता. त्यावेळी त्यांना हे कुटुंब चरसचा साठा घेऊन जाताना आढळले. हे कुटुंब आपण फॅमिली टूर साठी काश्‍मीरात आलो आहोत असे भासवून दरवेळी काश्‍मीरला जाते आणि तेथून उच्च प्रतीचे चरस ते येथे आणतात.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे बंडु उडानशिवे(वय 52), त्याची पत्नी क्‍लेरा (वय52), कन्या सिंथीया (वय 23) अशी आहेत. त्यांच्याशी संबंधीत जसर जहांगिर शेख नावाच्या इसमालाहीं यात अटक करण्यात आली आहे. महिला व मुलीला बरोबर घेऊन ते प्रवास करीत असल्याने त्यांच्या विषयी कोणाला संशय येत नसे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.