Big Accident: देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; 3 गाड्यांच्या विचित्र अपघातात 4 ठार

बुलढाणा – तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सातजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर मोहाडी गावाजवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला. दोन्ही बोलेरोमध्ये शेतीतील सोयाबीनची पोती होती. एका गाडीतील भाविक अकोल्यातहून पंढरपूला दर्शनासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्यामसुंदर रोकडे (55)- चालक, विश्वनाथ कराड (72), शंकुतला कराड (68), बाळकृष्ण खर्चे (70) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. तर मुरलीधर रोहणकार, सुलोचना रोहणकार, उषा ठाकरे, श्यामराव ठाकरे, अलका खर्चे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात टाटा सुमो गाडीचा चुराडा झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.