जेजुरी, (वार्ताहर)- देशसेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी ठेवून शासकीय सेवेत संधी मिळावा. त्यातून गाव, समाज व देशाची सेवा करा. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना समाजात मान सन्मान मिळवून द्या, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी केले.
जेजुरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता माध्यमिक व ज्युनियर महाविद्यालात शिवजयंती व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेछ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, शैक्षणिक अवस्थेत मोबाइलपासून विद्यार्थ्यांनी स्वताला दूर ठेवले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून जीवांच्या उच्चपदावर पोहोचण्याचा पर्यंत करा.
यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक सचिन सोनावणे, भाजपचे जिल्हा सदस्य सचिन पेशवे, जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त रोहित घाटे , मुख्याधापिका गायत्री बेलसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे समन्वयक प्रल्हाद गिरमे,बी के जागताप,सोमनाथ उबाळे, वर्षा देसाई,लीना पायगुडे आदींनी केले. कार्यक्रमात जिजामाता बुद्धिमत्ता शोध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.