मुंबई – हैदराबादेतील निर्भयाकांडांनंतर पोलिसांनी चार आरोपींना तातडीने अटक केली. मात्र या घटने नंतर संपूर्ण देश हादरला आहे. घडतनेती आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तसेच या घटनेविरोधात सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असून अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने सुद्धा इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, मल्लिकाने आपल्या पोस्ट मध्ये ‘स्टॉप रेप’ असं लाल भडक अक्षरात लिहून स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. देशात होणारे बलात्काराचे हे सत्र थांबले पाहिजे, बलात्कार होणं थांबले पाहिजे’ असं म्हणत तिने हैदराबादमधील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली आहे.