मोदींच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स @ ४०, ०००

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शेअर बाजाराने नवा उच्चांक  गाठला आहे. आज  शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली.

शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीही ७९. ३५ अंकांच्या वाढीसह १२, ०२५. २५ पर्यंत पोहोचला.

भव्यदिव्य सोहळ्यामध्ये  नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथग्रहण केल्यानंतर आता त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या नव्या शिलेदारांनी देखील केंद्रीय मंत्रिपद, राज्य मंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) आणि राज्य मंत्रिपदाची शपथग्रहण केली असून भाजपने यंदा मंत्रिपदांचे वाटप करताना प्रत्येक मित्र पक्षाच्या वाट्याला एक मंत्रिपद दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)