तीन जूनपासून सुरू होणार पुस्तक वाटप 

पिंपरी – राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातंर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा व खासगी अनुदानित 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. पुढील महिन्यात तीन ते 11 जून या कालावधीत आकुर्डी शहर साधन केंद्र येथील वसंतदादा प्राथमिक मनपा शाळा व पिंपरी केंद्रातील कर्मवीर भाऊराव पाटील शाळा या ठिकाणी पुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याची, माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

महापालिका व खासगी अनुदानित शाळांना दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यंदा शहरातील सहा प्रभागातील दोन उन्नत केंद्रामध्ये पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. वीस दिवसापूर्वी शिक्षण विभागाने बालभारतीकडे पुस्तकांची मागणी केली होती. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच, अल्प दृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सुलभ ठरणाऱ्या लार्ज प्रिंट पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

माध्यमनिहाय प्राप्त पुस्तकांची संख्या 6 लाख 39 हजार 594 आहे. यामध्ये, मराठी माध्यमात 1 लाख 639 पुस्तके, हिंदी माध्यम 3 हजार 518, उर्दू माध्यमात 4 हजार 44 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, यंदा शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. तसेच, शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली जाणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)