Share Market Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतविषयक धोरण समितीने आज रेपो दर जाहीर केला आहे. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ती 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी वाढीसह उघडलेला बाजार आता लाल रंगात व्यवहार करत आहे.
जागतिक बाजारातील वाढीदरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरावरील निर्णयापूर्वी गुरुवारी सकाळी देशांतर्गत बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 321.42 अंकांनी उसळी घेत 72,473.42 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 80.55 अंकांनी वाढून 22,011.05 अंकांवर पोहोचला. सेन्सेक्स सध्या 72,238 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. निफ्टीही घसरला असून 21,954 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
त्याकवळी एचसीएल टेक्नॉलॉजीज, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. आयटीसी, मारुती, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सच्या शेअर्सचे नुकसान झाले आहे. तसेच स्टेट बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा यांचा समावेश बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.
खाजगी बँकांबद्दल बोलायचे झाल्यास, इंडसइंड बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक देखील हिरव्या चिन्हावर आहेत. आशियाई बाजारांमध्ये जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट नफ्यात होता, तर हाँगकाँगचा हँग सेंग तोट्यात होता.