गराडे, (वार्ताहर) – हिवरे (ता. पुरंदर) गावच्या दोन दिवस चालणार्या श्री म्हसोबा देवाच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक गाडा ओढणे कार्यक्रम पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्री म्हसोबा देवास मंगळवारी (दि. 7) विधिवत अभिषेक घालण्यात आला. व फुलांची आरास करण्यात आली.
तसेच गावातील सर्व देव देवतांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनास खुले करण्यात आले. मिरवणुकीने श्री ंसह गावातील सर्व देव-देवतांना हार घालून नैवेद्य दाखवून मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर शंकर शिंदे बंधू यांचा मानाचा गाडा असणार्या या गाड्याच्या मागे 12 बैलगाड्या (रिकाम्या) दोराच्या साह्याने बांधण्यात आल्या होत्या.
गाड्याबरोबर अनवाणी असलेल्या भक्तांना रस्त्यावरून चालताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गाड्यापुढे महिलांनी कळशीत पाणी घेऊन पाणी ओतून तापलेला रस्ता थंड करत होत्या. देवाच्या गाड्याला लोकांनी नैवेद्य व पुष्पहार अर्पण केले.
नंतर या गाड्या भाविक बसले तर काही उभे राहिले. गाड्यापुढे पुढे बकरे कापले गेले तर गाडीचे मानकरी शंकर चिमाजी शिंदे हे होते. यातील मानाचा गाडा देवाचे भक्त सुनील दळवी यांना मिळाला. देवाचा गाडा व त्यामागे असणारे 12 गाडे असे एकूण 13 गाडे भाविकांनी ओढले.
यावेळी सरपच सरपंच भारती गायकवाड, उपसरपंच रामदास कुदळे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, सागर कुदळे, मनोज कुटे, शोभा दळवी, दिपाली चव्हाण, एम. के. गायकवाड, दिलीप लिंभोरे, दीपक चव्हाण, गुलाब गायकवाड, धर्माजी गायकवाड, सुदर्शन कुदळे, रमेश कुदळे, शांताराम दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.