नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील कापुरवाडीच्या घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमानाच्या मुर्तीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश भाऊसाहेब वामन (वय २७ रा. देवगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. कापुरवाडीच्या घाटात रस्त्याच्या कडेला हनुमानाची मुर्ती असून अज्ञात व्यक्तीने बुधवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेच्या पूर्वी मुर्तीची विटंबना केली.
सदरचा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक बोरसे हे करत आहेत.