Stock Market Closing On 27 October 2023: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजाराने चांगले पुनरागमन केले आहे. सहा दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर, शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी बाजार नेत्रदीपक वाढीसह बंद झाला. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली आहे, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांनी मागील दिवसातील मोठ्या घसरणीनंतर जोरदार खरेदी केली.
आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 634 अंकांच्या वाढीसह 63,782 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 190 अंकांच्या उसळीसह 19,000 अंकांचा टप्पा ओलांडून 10,047 अंकांवर बंद.
दरम्यान, आज बाजारात सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आजच्या व्यवहारात बँकिंग समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. त्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला आहे. मिफ्टी बँक 501 अंकांच्या किंवा 1.19 टक्क्यांच्या वाढीसह 42,782 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी समभागातील खरेदीमुळे निफ्टी आयटी 1.24 टक्क्यांनी, निफ्टी ऑटो 1.35 टक्क्यांनी, निफ्टी एफएमसीजी 0.89 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
आजच्या व्यवहारात धातू, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. मिड कॅप आणि स्मॉल स्टॉक्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली, मिड कॅप निर्देशांक 1.54 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 2.01 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 27 समभाग वाढीसह आणि 3 समभाग घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.33 कोटी रुपयांची वाढ –
आजच्या व्यापारात, बीएसईवर सूचीबद्ध समभागांची मार्केट कॅप 310.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ती गेल्या ट्रेडिंग सत्रात 306.21 लाख कोटी रुपये होती. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
वाढणारे आणि घसरणारे स्टाॅक –
आजच्या व्यवहारात अॅक्सिस बँक 3.07 टक्के, एचसीएल टेक 3.01 टक्के, एसबीआय 2.53 टक्के, टाटा मोटर्स 2.27 टक्के, एनटीपीसी 2.12 टक्के वाढीसह बंद झाले. डॉ रेड्डीज 0.45 टक्क्यांनी, यूपीएल 0.43 टक्क्यांनी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.