Singham Again – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ (Singham) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ (Singham Again) असे आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आहेत.
View this post on Instagram
त्यांच्या ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, सिम्बा’ या सारखे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता लवकरच त्यांचा बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील शुटिंगचे सेटवरील काही फोटो समोर आले असून, प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगमधील दोन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये कार आणि ट्रकला आग लागल्याचे दिसते.
चित्रपटाच्या शूटिंगमधील फोटोंसोबत त्यांनी ‘सिंघम अगेन’ या हॅशटॅगसह ‘वर्क इन प्रोग्रेस…’ असे कॅप्शन लिहिले आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगमधील फोटो पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत.