नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकांत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यामध्ये दोन विद्यमान आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. विद्यमानांपैकी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना पराभूत व्हावे लागले.
पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल, अमरिंदर सिंग आणि राजिंदर कौर भट्टल या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या पदरी अपयश आले. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत विधानसभेवर निवडून जाण्यात अयशस्वी ठरले. त्याशिवाय, गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हेही पराभूत झाले.