मिथिलेश जोशी
मुशर्रफ यांच्या राजकीय जीवनाचा उदयास्त…
लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली. त्यांनी स्वत:ला त्यावेळी देशाचा कार्यकारी अधिकारी म्हणूून जाहीर केले. त्यानंतर 2007मध्ये पुन्हा पाकिस्तानात पेचप्रसंग निर्माण झाल्यावर त्यांनी आणीबाणी लागू केली. त्यावेळी निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा गोंधळाच्या काळात पाकिस्तानची राज्यघटना अक्षरश: गुंडाळून ठेवली. त्यावेळी सरन्यायाधिशांसह अनेक न्यायाधिशांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
मुशर्रफ हे पाकिस्तानचे स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष जून 2001 मध्ये बनले. त्यांनीच आणिबाणी लागू केल्याचा आदेश काढला. सध्याची न्यायव्यवस्था ही दहशतवाद विरोधी लढ्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात भूमिका घेत असल्याने आणिबाणी लागू करण्यात आल्याचे त्या आदेशात म्हटले होते.
त्याकाळाचा आणि मुशर्रफ पर्वाच्या अंताचा घटना क्रम
नोव्हेंबर तीन, 2007 : राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडून आणीबाणी जाहीर. 1973ची राज्यघटना स्थगित. सरन्यायाधिश इफ्तिकार महंमद चौधरी यांच्यासह 61 न्यायाधिशांची बडतर्फी. सर्व खासगी वाहिन्यांवर बंदी. केवळ सरकारी पीटीव्हीवर आणीबाणी समर्थनाच्या बातम्या.
नोव्हेंबर 28, 2007 : मुशर्रफ पूर्णवेळ राजकारणातून निवृत्त. लष्करप्रमुख पदाची सुत्रे जन. अशफाक परवेझ कयानी यांच्याकडे सोपवली
नोव्हेंबर 29, 2007 : नागरी राष्ट्राध्यक्ष म्हणून मुशर्रफ यांनी सूत्रे स्वीकारली
डिसेंबर 15, 2007 : राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी आणीबाणी उठवली. सरन्यायाधिश आणि सर्वोच्च न्यायलयाचे सर्व न्यायाधिश यांचा नव्याने शपथविधी.
ऑगस्ट 18, 2008 : देशावर नऊ वर्ष राज्य केल्यानंतर बंडाची शक्यता लक्षात घेऊन मुशर्रफ पदावरून पायउतार
जुलै 22, 2009 : सर्वोच्च न्यायलयाकडून मुशर्रफ यांना आणीबाणीची कारणे स्पष्ट करण्याचे आदेश
जुलै 31, 2009 : आणीबाणी लागू करण्याचा आणि अधिकार एकवटून घेण्याचा मुशर्रफ यांची कृती बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अदेश आपली भूमिका मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी
ऑगस्ट सहा, 2009 : मुशर्रफ यांचा त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यास नकार, पाकिस्तान सोडून इंग्लंडला रवाना
जून आठ, 2010 : मुशर्रफ यांच्या साथिदारांकडून ऑल पकिस्तान मुस्लिम लिग या पक्षाची स्थापना. मुशर्रफ यांची अध्यक्षपदी निवड
मार्च 22, 2013 : मुशर्रफ यांच्यावर सुरू असणाऱ्या तीनही महत्वाच्या खटल्यात अटकपूर्व जामीन मंजूर
मार्च 24, 2013 : स्वत:हून परदेशात परागंदा झालेले मुशर्रफ सार्वत्रिक निवडणुकांसाठी देशात हजर
मार्च 27, 2013 : मुशर्रफ यांच्याकडून घटनेच्या कलम 62 आणि 63चे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याने देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची ज्येष्ठ विधीज्ञ ए. के डोगर यांची याचिका
मार्च 29, 2013 : सिंध उच्च न्यायलयाकडून मुशर्रफ यांच्या जामीनात वाढ. मात्र परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई
एप्रिल पाच, 2013 : देशद्रोह (शिक्षा) कायद्याच्या कलम 2 आणि 3 याचिका सुनावणीस घेण्यात सर्वोच्च न्यायलयाची मान्यता
एप्रिल सात, 2013 : सरन्यायाधिश इफ्तिकार मोहंमद चौधरी यांनी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठातून माघार
एप्रिल आठ, 2013 : सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्याचे समन्स बजावले. देश सोडून जाण्यास बंदी
एप्रिल 18, 2013 : जामीन रद्द केल्यानंतर इस्लामाबद उच्च न्यायलयाच्या आवारातून पलायन
एप्रिल 19, 2013 : न्यायाधिशांना अटक करण्याच्या प्रकरणात मुशर्रफ यांची शरणागती. त्यांच्या फार्म हाऊसलाच कारागृह बनवले
एप्रिल 30, 2013 : पेशावर उच्च न्यायलयाकडून मुशर्रफ यांना निवडणूक लढवण्यास बंदी
जून 24, 2013 : मुशर्रफ यांच्यावर घटनेच्या कलम सहा नुसार कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यालयात जाण्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून संसदेत जाहीर
नोव्हेंबर 19, 2013 : मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचे पाच आरोप दाखल
डिसेंबर 12, 2013 : देशद्रोहाच्या आरोपांना सामोरे जाण्याचे विशेष न्यायलयाचे मुशर्रफ यांना आदेश
डिसेंबर 20, 2013 : मुशर्रफ यांच्याकडून एका मुलाखतीत आपल्या नऊ वर्षात घडलेल्या चुकांसाठी क्षमायाचना
जानेवारी दोन, 2014 : हृदय विकाराने मुशर्रफ रुग्णालयात दाखल. वैद्यकीय कारणांमुळे अटक वॉरंट बजावले नाही
जानेवारी सात, 2014 : लष्करी रुग्णालयाकडून मुशर्रफ यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर. त्यात हृदयविकार गंभीर असल्याची माहिती
जानेवारी 28, 2014 : लष्कराच्या वैद्यकीय अहवालावर आक्षेप घेत लष्करी रुग्णालयाच्या वरीष्ठांना न्यायलयात हजर राहण्याचे आदेश
फेब्रुवारी सात, 2014 : विशेष न्यायलयाकडून देशद्रोहाच्या खटल्यात हजर होण्याचे पुन्हा आदेश
फेब्रुवारी 18, 2014 : सलग 22 सुनावणी चुकवल्यावर मुशर्रफ न्यायलयात हजर. मात्र लष्करी न्यायलयात खटला चालवण्याची मागणी
फेब्रुवारी 21, 2014 : विशेष न्यायलयाकडून लष्करी न्यायलयात खटला चालवण्यास नकार
मार्च 30, 2014 : मुशर्रफ यांनी देशद्रोहाचे आरोप फेटाळले, निर्दोष असल्याचा दावा केला
एप्रिल एक, 2014 : मुशर्रफ यांच्या आजारी मातोश्रींना शारजाहला नेण्यास सरकारची मान्यता
मे 14, 2014 : मध्यवर्ती तपास यंत्रणेकडून 2007ची आणीबाणी बेकायदा असल्याचे सज्जड पुरावे असल्याचा दावा
मार्च 14, 2016 ; वैद्यकीय कारणासाठी एकदा परदेशात जाण्याची मुशर्रफ यांच्याकडून मागणी
मार्च 16, 2016 : सर्वोच्च न्यायालयाकडून मुशर्रफ यांना परदेशी जाण्यास परवानगी
मार्च 18, 2016 : मुशर्रफ दुबईस रवाना, काही आठवड्यात परत येण्याचे आश्वासन
मे 11, 2016 : मुशर्रफ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून फरार घोषित
नोव्हेंबर10, 2017 : पाकिस्तान आवामी इत्तेहादच्या छत्राखाली 23 राजकीय पक्षांची मोट मुशर्रफ यांनी बांधली
ऑगस्ट तीन, 2018 : मुशर्रफ यांनी पाकिस्तानात येण्याची तयारी दर्शवली पण अटक न करण्याची विनंती केली
नोव्हेंबर 19, 2018 : मुशर्रफ यांना देशात आणण्याचे मुशर्रफ यांच्या वकीलांना आदेश
जून 11, 2019 : मुशर्रफ यांचा पासपोर्ट रोखला
ऑक्टोबर 24, 2019 : विशेष न्यायालयाकडून 24 ऑक्टोबरपासून खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश
नोव्हेंबर 19, 2019 : खटल्याचे कामकाज संपल्याचे जाहीर
डिसेंबर 2019 : विशेष न्यायालयाकडून 17 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे केले स्पष्ट
डिसेंबर 17, 2019 : विशेष न्यायालयाकडून देशद्रोहाच्या आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा जाहीर