नेवासा – राज्याचे मृदा व जलसंधारणमंञी शंकरराव गडाख-पाटील यांच्या स्वियसहाय्यक असलेल्या राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी राञी १० वाजेच्या सुमारास घोडेगांवनजिक असलेल्या लोहगावात घडली. जखमी राजळे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी दवाखाण्यात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मिळालेलय माहितीनुसार, गडाख यांचे स्वीयसहाय्यक राजळे हे त्यांचे गांव असलेल्या लोहगावात असतांनाच राञी १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने राजळे यांच्यावर तीन फायर केल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक गोळी मांडीत घुसली, दुसरी चाटून गेली तर तिसरी हुकल्याने मोठी घटना टळली आहे. या घटनेत राजळे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अज्ञात हल्लेखोरांनी गडाख यांच्या स्वीयसहाय्यकांवर नेमका कोणत्या कारणामुळे हल्ला केला ? या कटात किती आरोपींचा समावेश आहे याबाबत पोलिस सुञांकडून कोणताही माहीती स्पष्ट करण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंधारणमंञी शंकरराव गडाख यांच्या स्वीयसहाय्यकांवरच गोळीबार झाल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नगर येथील एका खासगी रुग्णालयात राजळे यांच्यावर उपचार सुरु असून राज्याचे जलसंधारणमंञी शंकरराव गडाख, विजय गडाख, आणि अर्थ व नियोजन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी रुग्णालयात जावून राजळेंच्या प्रकृतीची पाहणी केली.